समस्त शिंपी समाजाच्या एकतेची ताकद महाराष्ट्र राज्य महिला मंडळ एकसंघाने दर्शवले शक्तीचे प्रदर्शन
कार्यक्रमाची दीप प्रज्वलन सुरुवात एकसंघाचे महिला प्रदेश प्रमुख अध्यक्ष सौ रेखाताई मुळतकर, एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री महेशजी ढवळे, सौ किशोरीताई नामदास, श्री प्रमोद जी मुळतकर, श्री नानासाहेब पाथरकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व संत गजानन महाराज आणि नामदेव महाराज यांच्या पूजनाने झाली.
अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ संचलित महाराष्ट्र राज्य महिला मंडळ एकसंघाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथे दिनांक 9 मार्च रविवार रोजी अग्रसेन भवन येथे इतिहासातील सर्वात पहिला समस्त शिंपी समजातील महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष महेश ढवळे व जेष्ठ समाजभुषण नानासाहेब पाथरकर सचिव श्री.रुपेशजी खांडके मुंबई, अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ चे संस्थापक श्री. महेशजी ढवळे, संत नामदेव महराजचे 16 वंशज सूनबाई आईसाहेब किशोरीताई नामदास, सौ. अनुप्रिताताई वाकरे, सौ.अरुणाताई शोभणे, श्री रविंद्रजी शोभणे तसेच प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण अधिकारी सौ सारिकाताई मेतकर, शेगावच्या सौ अपर्णा संजय कुटे सौ.सुषमा लक्ष्मण गोरले हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एक संघाच्या महिला अध्यक्षा व कार्यक्रमाच्या आयोजिका सौ.रेखाताई मुळतकर यांनी केले.आपल्या समस्त शिंपी पोटजांतीचे संघटन होणे आणि संघटनेचा पाया व कणा बनून स्त्रीशक्ती ने संघटन मजबुत करावे असे आवाहन केले.
फक्त एका पोट जातीपुरता नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाज पोटजातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, वैद्यकीय ,शैक्षणिक , उत्कृष्ट महिला मंडळ ,भजनी मंडळ, बचत गटया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 ,महिला भगिनींचा माता गोणाई नारी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणूनच हा पुरस्कार सोहळा शिंपी समाजाच्या इतिहासातील पहिला पुरस्कार ठरल्याचे संत नामदेव महाराजांच्या 16 व्या वंशज आईसाहेब किशोरीताई नामदास यांनी सांगितले तसेच आयोजिका व कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. सौ.रेखाताई मुळतकर, डॉ. प्रज्ञाताई तल्हार, सौ बबीता माळवदकर, एडवोकेट संध्याताई बागुल व त्यांच्या संपूर्ण टीम ने राज्यस्तरावर महिला दिना चे आयोजन केले ही फार मोठी गोष्ट असून शिंपी समाजामध्ये समस्त पोट जातींना एकत्र आणण्याचे महान कार्य महिला मंडळाच्या वतीने संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये सर्व महिलांना एकसंघ निर्माण केल्याचे एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.महेशजी ढवळे साहेब यांनी सांगितले समाजामध्ये गट तट न पडता समाजातील सर्व पोटजातींना एकत्र आणण्याचे काम एक संघाच्या माध्यमातून आपण करणार आहोत असे त्यांनी या प्रसंगी सांगितले कार्यक्रमाला साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे व साहित्यिक सौ शोभने मॅडम यांनी महिला मंडळाच्या वतीने हा ऐतिहासिक कार्यक्रम घेतल्याने समाजातील महिला भगिनींना त्यांच्या कलागुणांना वाव देत माता गोणाई पुरस्कार देऊन फार मोठें महान कार्य केल्याचे त्यांनीय प्रसंगी सांगितले.कार्यक्रमाला माजी राष्ट्रीय अध्यक्ष महासंघाचे डॉ नानासाहेब पाथरकर हे आवर्जून उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. स्वप्नाताई धिरडे अमरावती व सौ. सरिता पवार यांनी केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या भगिनी अकोल्याचे – सौ.दिपाली जतिन मुळतकर, सौ.सोनाली सचिन मूळतकर, सौ. सुविधा तुषार भक्त, खामगावचे – सौ. प्रभा विनोद गोरले, सौ. अर्चना देवगिरीकर, सौ.वैशाली दिवसे,शेगावचे – सौ. शालिनी गोपाल जोध, सौ.निता शशिकांत गोटे, अकोल्याचे सौ.कल्पना हुरपुडे, सौ.सारिका चिंचोळकर, सौ.गांगुर्डे, सौ.मनीषा बोदडे यासह रेखाताई यांचे चिरंजीव व त्यांच्या कन्या नमिता नितीन पिहुलकर यांनी कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था बघितली.🙏🙏🙏🙏 चला पुन्हा एकसंघ होऊन लवकरच एक भव्य दिव्य कार्यक्रमासाठी सज्ज होऊया धन्यवाद !
Discussion about this post