प्रतिनिधी
प्रति जेजुरी म्हणुन ओळख असलेल्या श्री खंडोबा मंदिराचा 10 दिवसीय यात्रोत्सव गुरुवार 13 मार्च पासुन प्रारंभ होत आहे या देवस्थानाला महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल डॉ राजेन्द्र प्रसाद विनोबा भावे अश्या अनेक थोर महापुरुषानि भेटी दिल्या आहेत
मंदीराची आख्यायिका
फैजपुर येथून जवळच असलेल्या न्हावी गावात त्याकाळी ग्रामस्थानि कुलदैवत श्री खंडोबा भगवान मंदिर बांधले या मंदिरात मूर्ति प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी फैजपुर येथून मूर्ति घेऊन जात असतांना वाटेत एका विहिरिजवळ भाविक मंडळी विसाव्यासाठी थांबली परंतु परत निघत असतांना मूर्ति ठेवलेली बैलगाड़ी काही करता जागेवरुन हलत नव्हती अगदी बारा बैलजोड्या जुंपुन सुद्धा बैलगाड़ी तिळमात्र हललि नाही खंडोबाने होळकर राजे व् ग्रामस्थाना दृष्टांत दिला व याजागी मंदिर बांधून मूर्ति स्थापित करण्याचे सांगितले नंतर होळकर घराण्याच्या उपस्थितीत काशीच्या पुरोहितांच्या हस्ते वेदोक्त पुजा द्वारे फाल्गुन पौर्णिमा होळी च्या दिवशी मूर्तिचि स्थापना करण्यात आली व गावात पाच दिवस आनंदोत्सव साजरा करण्यात आला व् आजही ही प्रथा अखंडितपणे यात्रेच्या रूपाने साजरी होत आहे
गुळाची रेवड़ी प्रसिद्ध
यात्रोत्सवात गुळाची रेवड़ी ही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे यासोबत विविध खाद्यपदार्थ ,पाळणे ,ज्वेलरि दुकाने ,संसारोपयोगि सामानाची दुकाने थाटण्यात येतात यात मोठी आर्थिक उलाढाल होते
मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे 1998 मधे तत्कालीन गादीपति महंत घनश्याम दासजी महाराज यांनी मंदिर जीर्णोद्धार करून परिसरात मंगल कार्यालये व सर्व सुखसोयी उभारण्यात आल्या याच धर्तीवर विद्यमान गादीपति महंत पुरुषोत्तमदासजी महाराज यांचे शिष्य तथा उत्तराधिकारी महामण्डलेश्वर पवनकुमार दासजी महाराज यांनीही सुसज्ज भक्तनिवास , जलकुंभ याची उभारणी केलि येथे रोज सकाळ संध्याकाळ अभिषेक पूजा आरती केलि जाते
तरी सदर यात्रेनिमित्त दुरुनदुरुन भाविक दर्शनासाठी येतात फैजपुर च नव्हे तर पंचक्रोशित या यात्रेने नवचैतन्य निर्माण होते दहा दिवस यात्रेत भरगच्च गर्दी दिसुन येते
यात्रा दहा दिवस असल्याने एकाचवेळी गर्दी करू नका , मंदिर व यात्रेचा परिसर स्वच्छ ठेवावा नियमांचे पालन करून यात्रोत्सव शांततेत पार पाड़ावा असे आवाहन मंदिराचे उत्तराधिकारी महामण्डलेश्वर पवनकुमार दासजी महाराज यांनी केले आहे
Discussion about this post