राज्याच्या महसूल वाढीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच मुद्रांक शुल्क सुद्धा तितकेच महत्वाचे ठरले आहे जिल्हा मुद्रांक कार्यलयास सन २०२४-२५ या वर्षाकरिता ४०० कोटींचे टार्गेट ठरवून दिलेले होते सद्य स्थिती मध्ये शासनाच्या तिजोरीत १० मार्च पर्यंत ३०० कोटी इतका महसूल जमा झाला असून उद्दिष्ट ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तर एक एप्रिल पासून रेडी रेकनर दरामध्ये तब्बल १० टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अलीकडील काळात दस्तनोंदणीसाठी विक्रमी गर्दी पहायला मिळत आहे. एका दिवसामध्ये ६० ते ७० दस्त नोंदवले जात आहेत. सांगली मिरजे मधून वाढती गर्दी लक्षात घेता कार्यालयीन वेळी दोन तासांनी वाढवली आहे. यंदा चांगल्या महसूल वाढीची अपेक्षा आहे. रेडी रेकनर दरही कॊरॊना काळापासून वाढलेले नाहीत त्यामुळे यंदा मात्र १० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जातेय. जिल्ह्यातील १६ कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. कार्यालयीन वेळेतही बदल केल्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी झाली आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने दस्त नोंदणीही झपाट्याने होत आहे. मिरजेतील कार्यलयातही दस्त नोंदणीची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
Discussion about this post