
विविध पक्ष ,सामाजिक संघटना,तानाजी सोनकांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ उदगीरात २० मार्च रोजी जनाआक्रोश मोर्चा होणार सहभागी
उदगीर,(श्रीधर सावळे )मजुरी मागीतल्याने तानाजी सोनकांबळे यांना कंत्राटदार मेहराज पटेल , खलील ठाणेदार , गौस या आरोपींने जबर मारहाण करून तानाजी सोनकांबळे यांची हत्या केली होती. हात्येच्या निषेधार्थ व आरोपीला फाशीची शिक्षा दयावे या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने उदगीर येथे गुरुवार दि २०मार्च रोजी सकाळी १०वा डाॅ अण्णा भाऊ साठे पुतळा ते उपविभागीय तहसील कार्यालय पर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . आकोश मोर्चा संदर्भाद उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवेदन देण्यात आले , मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रा पंडित सूर्यवंशी, जवाहरलाल कांबळे, अरविंद शिंदे ,राजकुमार चव्हाण संग्राम अंधारे बालाजी रणदिवे शेषराव करखेलीकर प्राचार्य गोविंद भालेराव उपेंद्र चव्हाण अजित कांबळे प्रल्हाद थोरे पप्पू गायकवाड , प्रभुदास गायकवाड ,एडवोकेट कांबळे ,प्रदीप जोंधळे, दयानंद कांबळे, सुदर्शन मसुरे, ईश्वर सूर्यवंशी ऍड किशोर खादीवाले रवींद्र बेद्रे मारुती गायकवाड दीपक गायकवाड विश्वनाथ गायकवाड , करण आंधारे ,रणजित कांबळे, रामेश्वर शिंदे, देवेन टाकळकर ,संतोष रणक्षेञे, आदी उपस्थित होते.
Discussion about this post