
प्रतिनिधी – किरण पाठक ,अमळनेर..
अमळनेर – शहरातील रामेश्वर नगर परिसराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील रहिवाश्यांनी करीत मुख्याधिकारीना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण शहरात पाणीपुरवठा सुरळीत असताना आमच्या भागात सुरळीत नाही,कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर कधीही येत नाहीत,शहरात भुयारी गटार चे काम सुरू असताना आमच्या भागात कुठेही काम नाही,लहान गटारी देखील झाल्या नाहीत,पाणीपुरवठा कर्मचारी हेतुपुरस्कर दुर्लक्ष करतात तरी तातडीने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी समाधान पाटील,चेतन चौधरी,कोकिलाबाई मराठे, नाना सोनवणे,जगदीश सोनार,जयेश मराठे आदी सह नागरिक उपस्थित होते..
Discussion about this post