
भोकरदन प्रतिनिधी रमेश जगताप..
भोकरदन तालुक्यातील सुभानपुर येथे नियोजित बौद्ध विहाराच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आल्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या घटनेची चौकशी करून दोशीवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भोकरदन तालुक्यातील सुभानपुर नियोजित बौद्ध समाजाची जागेवर काही समाजकंटकांनी हेतू पुरस्कार पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन समाजातील निर्माण होऊन गावात जातीय तीळ निर्माण झाला आहे. हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गावात सुरू आहे. 19 जानेवारी 2025 रोजी काही समाजकंटकांनी बौद्ध विहाराच्या जागेवर जेसीबीच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी भला मोठा खड्डा खोदण्यात आला होता. गावातील बौद्ध समाजाने भोकरदन येथे पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर तक्रार दिली होती. त्यानंतर उपयोगी अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप तहसीलदार संतोष बनकर पोलीस निरीक्षक किरण बिडवे मंडळ अधिकारी ग्रामसेवक झोरे नांजा येथील ग्रामसेवक आधावे बीट अंमलदार टेकाळे या शासकीय अधिकाऱ्यांनी गावातील घटनास्थळाला भेट दिली होती. खोदलेला खड्डा हा बौद्ध विहार च्या जागेवर खोदलेला त्यांना दिसून आला होता. त्यामुळे दोन्ही समाजाची बैठक घेऊन खोदलेला कट्टा दाबण्यात आला होता. खड्डा बुजवण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावातील सवर्ण लोकांनी ठराव घेतला की बौद्ध समाजातील लोकांना शेतात काम द्यायची नाही. तसेच त्यांना दळण दळून द्यायची नाही किराणा दुकानावर किराणा सामान द्यायची नाही. तसेच सर्व बौद्ध समाजावर अलिखित बहिष्कार टाकण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर असून गावातील लोक भयभीत झाली आहे. तसेच गावातील सवर्ण लोकांकडून जातीवादाचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुभानपूर गावातील बौद्ध समाजातील महिला पुरुष लहान मुलं-मुली यांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बौद्ध विहाराला व गावातील बौद्ध समाजातील नागरिकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. व गावातील बौद्ध समाजाला गावगुंडापासून वाचवण्यात यावे अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देखील महापुरुषाचा आहे. त्यांचा पुतळा बसवण्यासाठी आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. परंतु गावातील सुवर्ण लोक जातीय ते निर्माण करण्यासाठी वागत आहे. त्यानुसार आमची अशी मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य त्या ठिकाणी सन्मानाने स्थलांतरित करण्यात यावा. अन्यथा हे प्रकरण वाढल्यास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या प्रकरणाकडे प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर रिपब्लिक सेनेचे प्राध्यापक शीलवंत गोपनारायण डॉक्टर अरुण शिरसाट गंगाधर पगार राहुल खरात नथू मिलिंद आठवले खरात गंगाधर दाभाडे
Discussion about this post