
आर्णी :
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचा आदर्श सरपंच सन्मान २०२५ जाहीर झाला आहे.आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत शेकलगाव येथील सरपंचा नीलिमा संजय मुंढे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. माऊली संकुल सभागृह अहिल्या नगर येथे रविवारी दि. ९ मार्च रोजी पार पडलेल्या स्वराज्य सेवा संघाच्या आदर्श सरपंच सन्मान सोहळ्यात शेकलगावच्या सरपंचा नीलिमा संजय मुंढे यांना या सन्मानित करण्यात आले आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार दिल्या जातो. दरम्यान २०२५ या वर्षीचा सुद्धा सन्मान जाहीर करण्यात आला. सरपंचा निलिमा मुंढे यांच्या विकासाची दखल स्वराज्य सरपंच सेवा संघाने घेत या वर्षीचा आदर्श सरपंच सन्मान सरपंचा नीलिमा मुंढे यांना जाहीर करण्यात आला..
Discussion about this post