
धाराशिव ,(जिल्हा प्रतिनिधी – विकास वाघ)
नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग धाराशिव ने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ड्रेस डिझाईनिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.
सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून १५० च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत प्रथम ,द्वितीय व तृतीय अशा आलेल्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख दहा हजार, सात हजार, पाच हजार अशी रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर स्मिता गवळी यांनी केले . प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तारअधिकारी दैवशाला हाके ,डॉक्टर रेखा ढगे ,संस्था अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे, दीपा रोडे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लोखंडे यांनी केले तर स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्राध्यापक योगेश जोगदंड , प्रा. उमेश कांबळे ,प्रा. नम्रता वरठा ,प्रा. आम्रपाली कांबळे ,प्रा. कामडी, प्रा. दिव्या ,यांनीप्राचार्या डॉ.शैलजा पैकेकर, प्राचार्या मीना गडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली.
सदर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला..
Discussion about this post