संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक राय कुमार बी गुजर प्रशालेत बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 व गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे व शिरूर तालुका क्रीडा संघटना आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
याप्रसंगी या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे या संस्थेचे मानद सचिव अरविंद ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी मशाल पेटवून व शपथ घेऊन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या क्रीडा स्पर्धा बद्दल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खेळ कसा महत्त्वाचा आहे हे आपल्या मनोगतातून विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ,संचालक विजय ढमढेरे परेश सातपुते, शिरूर तालुका क्रीडा संघटना कार्याध्यक्ष किरण झुरंगे, सचिव मनोज धिवार, उपाध्यक्ष कैलास खंडागळे युवा उद्योजक बाबा चव्हाण हे उपस्थित होते. तर दुसऱ्या दिवशीचे समारोपाच्या स्पर्धांचे उद्घाटन शिक्रापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नात डॉक्टर सुप्रिया गावडे व तळेगाव ढमढेरे चे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र भगत यांनी केले. तालुक्यातून विविध शाळांतून जवळपास 97 संघ या स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून आले होते व अत्यंत चुरशीच्या व रंगतदार अशा सामन्यांचे नियोजन प्रशालेने केले होते.
या स्पर्धेचे पंच म्हणून विकी हरगुडे, विक्रम बधे, सचिन राऊत, प्रथमेश मोरे, जयदीप जठार, विशाल कदम प्रशांत पोळ व नवनाथ पवार यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे
14 वर्षे वयोगट (मुले)
१. प्रथम क्रमांक पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी
२. द्वितीय क्रमांक कै. रा. गे. पलांडे आश्रम शाळा मुखई
३. तृतीय क्रमांक स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे
(17वर्षे मुले)
१. प्रथम क्रमांक स्वातंत्र्यसैनिक राजकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे
२. द्वितीय क्रमांक कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा मुखई
३. तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे
19 वर्षे (मुले)
१. स्वातंत्र्यसैनिक राजकुमार बी गुजर उच्च माध्यमिक प्रशाला तळेगाव ढमढेरे
२. द्वितीय क्रमांक समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला तळेगाव ढमढेरे
३.तृतीय क्रमांक रा. गे. पलांडे आश्रम शाळा मुखई
14 वर्षे (मुली)
१. प्रथम क्रमांक पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी
२. द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे
३. तृतीय क्रमांक श्री गुरुदत्त विद्यालय पिंपरखेड
सतरा वर्षे (मुली)
१. प्रथम क्रमांक स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे
२. द्वितीय क्रमांक कै रा. ग. पलांडे आश्रम शाळा मुखई
३. तृतीय क्रमांक श्री गुरुदत्त विद्यालय पिंपरखेड
19 वर्षे (मुली)
१. प्रथम क्रमांक कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा मुखई
२. द्वितीय क्रमांक स्वातंत्र्यसैनिक राजकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे
३. तृतीय क्रमांक समाजभूषण संभाजी भुजबळ उच्च माध्यमिक प्रशाला तळेगाव ढमढेरे
या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून पायल गवारे ,वेदांत गवारे हे दोघे चमकले तर उत्कृष्ट पंच म्हणून प्रशांत पोळ व विशाल कदम यांची निवड झाली. त्याचप्रमाणे उत्कृष्ट संघ स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला 17 वर्षे मुले या संघाची निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये स्वयंसेवकांनीही अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी बजावली ते स्वयंसेवक स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेचे कष्टाळू विद्यार्थी पुनीत धनगर, प्रतीक बिराजदार, ऐश्वर्या भुजबळ व यश शेवते हे होते.
तसेच या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ते व तळेगाव ढमढेरे चे युवा उद्योजक मंदार पवार यांच्या सौजन्याने प्रत्येक संघासाठी ट्रॉफीचे नियोजन करण्यात आले होते. या ट्रॉफीचे बक्षीस वितरण स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले . या सर्व बक्षीसांचे बक्षीस वितरण शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच या तालुकास्तरीय स्पर्धांसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित ,बापू खारतोडे ,जगन्नाथ ढमढेरे, अभिजीत कैलास ढमढेरे, बाळासाहेब येळे ,अभिजीत ढमढेरे यांनी विशेष असे योगदान दिले.
त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी धनंजय ढमढेरे यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स कॅप चे वाटप प्रत्येक संघातील खेळाडूंसाठी करण्यात आले. या स्पर्धेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक कुंडलिक कदम यांनी केले. तर या सर्व स्पर्धांचे नियोजन प्रशालेचे उपशिक्षक व क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र भगत, नंदा सातपुते, गोरक्षनाथ वाळके यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
या स्पर्धांच्या आयोजनासाठी स्वातंत्र्यसैनिक राजकुमार बी गुजर प्रशालेचे सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली या स्पर्धांसाठी गुजर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post