देशभरात महिला व लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी,सर्व पुरोगामी पक्ष,सामाजिक संघटना आणि संवेदनशील सांगलीकरांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत सांगली शहरात निषेध व मुकमोर्चा काढण्यात आला.
त्याचबरोबर मा.न्यायालयाचा आदर करत बंद मागे घेत मुक मोर्चा काढून सरकारचाही निषेध सर्वांच्यावतीने करण्यात आला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज,जत विधानसभेचे आमदार विक्रम सावंत,
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील,शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षाचे शहरजिध्यक्ष संजय विभुते,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार,
कॉम्रेड उमेश देशमुख,नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर,मराठा सेवा संघचे डॉ. संजय पाटील व छाया पाटील तसेच महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीचे घटक पक्ष,आजी माजी नगरसेवक,सर्व पक्षाचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष महिला पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, महिला व युवती तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महालिंग हेगडे.
शहर जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा
राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती.
शरदचंद्र पवार.
सांगली.

Discussion about this post