भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
मुंबई कांदिवली पश्चिम येथील इराणी वाडी या ठिकाणी श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था अंतर्गत एस.आर.ए.अंतर्गत मंदिर बांधण्यासाठी मा.खासदार गोपाळ शेट्टी यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात जाऊन ना हरकत प्रमाणपत्र साठी आग्रह केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गैणोरे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन आजच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल,असे सांगितले.कांदिवली येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था इराणी वाडी येथे विकासक विपुल मेहता यांनी एस.आर.ए.अंतर्गत रहिवाशांना घरे दिली, परंतु परिशिष्ट…२ मध्ये ४६ क्रमांकावर मंदिर समाविष्ट असून ही मंदिर बांधले नसल्याने तेथील रहिवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.याबाबत रहिवाशांनी मा.खासदार गोपाळ शेट्टी कडे तक्रार केली असता खासदार गोपाळ शेट्टी यांनी याबाबत तीव्र खंत व्यक्त केली.मंदिरासाठी कांदिवली पोलिस ठाणे येथून मंदिरासाठी ना हरकत प्रमाणपत्र आणण्यासाठी सांगितले.रहिवाशी पुरुष व महिला यांनी खासदार गोपाळ शेट्टी सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गैणोरे यांचेशी चर्चा केली.
चर्चा सकारात्मक होऊन आजच या बाबतीत मी पत्र देतो .असे सांगितले.यावेळी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले,” मी भाजपा चा खासदार होतो, नगरसेविका भाजपाच्या ,आमदार भाजपा चे देशात राज्य भाजपाचे मग या रहिवासी बांधवांवर अशी वेळ का यावी? परिशिष्ट २ मध्ये नाव नमूद असून सुद्धा मंदिर बांधले नसल्याने तेथील रहिवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर बांधले जाईल.हा विश्वास तेथील प्रत्येक रहिवाशांना वाटत होता.या प्रसंगी श्री.ज्ञानोबा तुकाराम वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ (वासकर फंड)यांचे विठ्ठल मंदिर व रहिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भारत कवितके मुंबई कांदिवली


Discussion about this post