“सोनापूर येथे ग्रामपंचायत च्या ग्रामसभेला ग्रामपंचायत सरपंच व सदस्य गैरहजर..”
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सोनापुर या गावात गेल्या 23 तारखेला ग्रामसभा घेण्याचे नियोजित केलें.
ग्रामस्थांनी आपले कामे आटोपून 11वाजता ग्रामस्थांनी नियोजित ठिकाणी हजर होते.विविध मुद्द्यावर ग्रामसभेमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते, सदर ग्रामसभा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनापुर येथिल पटांगणात ठेवण्यात आली.पण ग्रामपंचायतला निवडूण दिलेले नऊ ग्रामपंचायत सदस्यापैकी फक्त दोनच सदस्य हजर आणी ग्रामसेवक असल्याने ग्रामस्थ कमालीचे नाराज झाले.

गावात दोन महिन्यापासून पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करणारी नळ योजना बंद, मोदी आवास योजना, प्र.आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना, तंटामुक्त गाव समितीची निवड व त्यामार्फत गावात दारूबंदी,विजेचा लपंडाव,आरोग्य विषयक, नाली उपसा, पाणी कर , शेती विषयक योजना, मागेल त्याला विहीर, शेततळे, अश्या अनेक योजनेची माहिती तसेच प्रलंबित असलेली निधीची , कामाची,माहिती कुणाला विचारावं ह्याच संभ्रम निर्माण झाल्याने ग्रामस्थानी सदर बाब ग्रामविकास अधिकारी शेंडे ह्यांना बाकी सदस्याविषयी विचारले असता ग्रामविकास शेंडे ह्यांनी “ते सदस्य येतील किंवा नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे” असे उद्धट उत्तर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आणि ग्रामपंचायत कार्यालयीन रेकॉर्ड शिपाई कडे देऊन पळ काढला.

संतप्त झालेल्या ग्रामस्थानी सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी ,यासाठी पंचायत समिती सावली येथे जाऊन घडलेल्या घटनांची माहिती निवेदन देऊन गटविकास अधिकारी वासनिक साहेब यांच्या लक्षात आणून दिले.निवेदन देताना डोमाजी शेंडे मा.संचालक कृ.उ बा.ससावली,श्रीधर सोनुले अध्यक्ष्य शाळा व्यवस्थापन समिती, यशवंत गुरणुले मा.उपसरपंच सोनापुर, दिनकर वाघाळे उपाध्यक्ष से स सो सोनापुर, सुदर्शन गोवर्धन आकाश कोसरे, प्रमानंद गोवर्धन,शुभम बांबोळे,प्रफुल राऊत,कैलाश वाघाळे, बंडू गोवर्धन, अमोल कोसरे, गजानन मोहूर्ले, गोपीचंद सोनुले , गिरिधर वाघाळे, डोपाजी वाघाळे, सुरेश भोयर,समस्त गावातील नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post