दिवटे प्रतिनिधी:
बोधेगाव : दिवटे गावा मध्ये रविवार (दि.२५) रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजना कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कणसे, अंगणवाडी सेविका कल्पना कणसे, आशा सेविका भराट यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना या योजनेची माहिती देऊन अंगणवाडी मध्ये लाभार्थ्यांची फॉर्म भरून घेतले व मार्गदर्शन केले . ग्रामस्थांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सविस्तर , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभार्थी झाल्यास वर्षाला 3 हजार रुपये मिळणार आहेत.
ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्यामार्फत राबवली जात असून, लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना या योजने मार्फत 3 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात तीन हजार जमा केले जाणार आहेत. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट दोन फोटो, पासबुक झेरॉक्स, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळख पटवण्यासाठी विविध केलेली आहे.
Discussion about this post