दिवटे प्रतिनिधी:
बोधेगाव : शेवगाव तालुक्यामध्ये तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे काढणीला आलेले उडीद पीक डोळ्यादेखत भिजत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
यंदा पाऊसाला लवकर सुरुवात झाल्याने पेरण्या लवकर झाल्या. त्यामुळे उडीदाचे पीक जोमात आलेले आहे. सध्या काढणीला आलेल्या उडदाचे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
त्यामुळे उत्पादनात 70 ते 80 टक्केहून अधिक घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेवगाव तालुक्यात नगदी पीक म्हणून उडदाच्या पिकाकडे पाहिले जाते. यंदा पाऊस लौकर आल्याने पिकेही जो मात आहेत. गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस सुरू आहे. शुक्रवारी तालुक्यातील काही भागात जोरदार व मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर शनिवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेले व उभे असलेले उडीदाचे पीक भिजून गेले आहे.
काही ठिकाणी उडीदाला कोबही फुटत आहेत. उडीदाबरोबरच बाजरी ,मूग व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Discussion about this post