*दर्यापूर विधानसभा उमेदवारी मातंग समाजालाच मिळावी; मोर्चेबांधणी सुरु *
अमरावती :- दि: २५/०८/२०२४ रोजी शासकीय विश्रामगृह अमरावती येथे सकल मातंग समाजाचे चिंतन बैठक पार पडली. आगामी निवडणूक महाराष्ट्र विधानसभा २०२४ करिता सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय, सर्व संघटना , सर्व समाज बांधव यांची उपस्थित होते.
या बैठकीला दर्यापूर विधानसभेचे प्रमुख दावेदार म्हणुन काँग्रेस पक्षा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तथा सचिव युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सागरभाऊ कलाने, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय जोंधळेकर, भाजप पक्षा चे दावेदार प्रदेश सचिव लोकसभा प्रभारी प्रमोद खंडारे, अनुसूचित जाती उपाध्यक्ष श्री.रमेश अंभोरे आधी उमेदवार उपस्थित होते.
या बैठकीचे उद्घाटक समाजभूषण पुरस्कृत (बाबूजी) उत्तमरावजी बैसने तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ लहूजी सेना संस्थापक मेजर महादेवजी खंडारे होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये टायगर फोर्स अध्यक्ष गणेशदासजी गायकवाड , लहुजी शक्ती सेना विदर्भ अध्यक्ष रुपेशजी खडसे, माजी सभापती अनिलजी सोनटक्के, मतदार राज वृत्तपत्राचे संपादक विजयजी गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते दादारावजी स्वर्गे, ब्रँड असोसिएशनचे अध्यक्ष गणेशजी कलाने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजण : आकाश खडसे व पंकज जाधव यांनी केले.
सूत्रसंचालन : सागर लोखंडे यांनी केले तर आभारप्रदर्शन मंगेश माहोरे यांनी केले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन वमलारण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यादरम्यान सर्वानुमते मातंग समाजाचे तरुण तडफदार सागर ज्ञानेशराव कलाने यांना आमदारकी लढविण्या करिता प्रथम प्राधान्य देण्यात आले सर्वांनी टाळ्याच्या आवाजात अनुमोदन दिले. मातंग आमदार दर्यापूर विधानसभेत व्हावा यासाठी सर्वांनी पोटतिळकिने आपापले मत मांडणी महाराष्ट्र राज्याला स्थापना होऊन एकूण ६४ वर्षे पूर्ण झाली परंतु अद्याप पर्यंत ही विदर्भामध्ये एकही आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य विधान परिषद सदस्य महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणत्याही संविधानिक प्रमुख पदावरती मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप परत दिली नाही यामुळे आज रोजी मातंग समाजाला चिंतन करण्याच काम राजकीय पक्षांनी आणला आहे.
याकरिता सकल मातंग समाज अमरावती जिल्ह्यामध्ये जो ही पक्ष मातंग समाजाच्या पक्षातील विस्तवान कार्यकर्त्याला कार्यकर्त त्याच्या कार्यानुसार जर संधी दिली तर संपूर्ण मातंग समाज मातंग समाज तन मन धनाने उमेदवार निवडून आणण्याचे काम करेल. याकरिता मातंग समाज स्वतः सर्व समाज एकत्रित येऊन त्या उमेदवाराला निवडून आण्याचे काम करेल असे बैठकीमध्ये सर्वानुमते एका मताने ठराव पारित करण्यात आला. आणि ही विधानसभा मातंग समाजाने लढवावी सर्व पक्षांना मातंग समाजाचे जाहीर विनंती करण्यात आली. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार ज्या ज्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अनुसूचित जाती वर्गातील त्या त्या समाजाला प्रतिनिधीत्व दिल्या जाते अमरावती लोकसभा असताना देखील मातंग समाजाचा कधीही विचार केला गेला नाही. म्हणून या वेळेस सर्व समाजाच्या वतीने दर्यापूर विधानसभा मतदारसंघात मातंग समाजालाच मिळावी सर्वानुमते ठराव पारित झाला.
यावेळी डॉ.रवीभाऊ खडसे , उद्योजक सुभाषजी शिंदे, बँड असोसिएशनचे सचिव सुरेशराव गवळी, गजानन भाऊ शिंदे, इटकी ग्रा.उपसरपंच राजूभाऊ वाळसे, ग्रा.अडूळा बाजार सरपंच अंकुशराव खंडारे, ग्रा.खल्लार बेंबळा सरपंच अशोकराव खंडारे, माजी अध्यक्ष सुधीरभाऊ थोरात, लहुजी शक्ती सेना अमरावती शहर अध्यक्ष गौरव गवळी, दर्यापूर अध्यक्ष ईश्वर खंडारे, ज्येष्ठ नेते सिताराम खंडारे,निवृत्त अधिकारी शंकरराव खंडारे, विठ्ठल भाऊ वानखडे, संदीप भाऊ शिंदे, राजू भाऊ खंडारे,मंगेश मनोरे, प्रदीपभाऊ साठे, अविनाश खडसे, जितेश अंभोरे, अंजनगाव रामेश्वर सरकटे, गणेश रावजी खंडारे, दिलीप खंडारे,विनोद जोंधळे, राजेश सरकटे, संजय जाधव विनोदभाऊ वाघमारे, अक्षय जोंधळे, सुमित थोरात, सातेगाव सजयभाऊ हिवराळे, सुरेंद्रभाऊ वानखडे, शामभाऊ खंडारे, सुरेशभाऊ खंडारे, शंकर खडसे,हिरामण इंगळे, संतोष कलाने, रमेश राव पाटोळे, सुरेश वालसे, सागर खंडारे, शाम खंडारे,पवन खंडारे, उत्तमराव वाघमारे, दादाराव जोंधळे , नागेश कलाने, किशन कलाने, रवी तायडे, विनोद वाघमारे, राजू सावळे, दिलीप झाडे, विलास गवळी,अभी इंगळे,विजय खंडारे , दिनेश खंडारे, सतीष जोंधळे, बजरंग खंडारे,अष्टम जोंधळे,प्रवीण पाटोळे, ज्ञानेश्वर वानखडे ,आकाश शेलार,
अमरावती जिल्ह्यातील पाधाधिकरी मोठ्या प्रमाणात मातंग समाजाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठा जनसमुदाय या बैठकीला उपस्थित होता.

Discussion about this post