अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव हे शेळी-मेंढ्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ असली तरी आता पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही. धनगर समाजातील मेंढपाळ आपली जनावरे घेऊन बाजारात येतात, पण त्यांना योग्य मोबदला मिळत नाही.
पूर्वी बेंगलोरचे व्यापारी येथे मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या खरेदीसाठी यायचे, मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांना धमक्या देऊन हुसकावून लावले. लोकडाऊननंतर ही परिस्थिती अधिकच बिघडली असून, आता नौषाद अली शेठ नावाचा व्यापारी मोठ्या प्रमाणावर बक्र (मेंढ्यांची विक्री) आपल्या मनमानी दराने घेत आहे.
👉 पूर्वी ६,००० – ६,५०० रुपयांना विकले जाणारे बक्र आता फक्त ३,५०० – ४,५०० रुपयांना विकले जात आहेत. व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असून, धनगर समाज संघटनांनी या प्रकारात हस्तक्षेप करून या अन्यायकारक व्यवस्थेला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
📍 प्रतिनिधी:


Discussion about this post