कोयना धरण..
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरण साठा 100 tmc पुर्ण झाला असले कारणाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २:०० वा. सांडव्यावरील विसर्ग वाढवून २०,००० क्युसेक्स करण्यात येणार आहे. नंतर आवक नुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग २२,१०० क्युसेक्स इतका असेल.
या मुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
Discussion about this post