मावळ विधानसभा अंतर्गत माळीनगर, बोडके वाडी, माळवाडी, श्रीकृष्णनगर, आणि देहू या ठिकाणी 60 ते 70 परिवार राहतात. अनेक वर्षापासून त्या ठिकाणी रस्त्याच्या अभावी नागरिकांना खूप समस्या सहन करावी लागत आहे.
नागरिकांची समस्या
या परिसरात रस्त्याच्या अभावामुळे नागरिकांना अनके अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना गाडी खूप लांब लावून चालत जावे लागते, ज्यामुळे अडचणी वाढतात. यामुळे दैनंदिन जीवनात खूप त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांकडून मागणी
नागरिकांनी या समस्येबाबत पंकज गोपाळराव तंतरपाळे यांच्याशी संपर्क साधला. परिसरातील नागरिकांची बैठक घेण्यात आली, ज्यात नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. या बैठकीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भाग घेतला आणि त्यांच्या समस्या सांगीतल्या.
पंकज गोपाळराव तंतरपाळे यांची प्रतिज्ञा
समस्येची पाहणी केल्यानंतर, पंकज गोपाळराव तंतरपाळे यांनी ताबडतोब समस्येचा सकारात्मक मार्ग काढून सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे वचन दिले. त्यांनी आश्वासन दिले कि रस्त्याच्या समस्येचा निराकरण लवकरच होईल.
सदैव आपल्या सोबत पंकज गोपाळराव तंतरपाळे.
Discussion about this post