हा पुतळा भारतीय नौदल दलाच्या साह्याने उभारण्यात आला होता सिंधुदुर्ग शेजारी जंजिरे राजकोटावर उभारलेला हा पुतळा होता तो जमीन दोस्त कसा झाला माननीय पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले मालवण किनारपट्टीवर नौदल दिन साजरा करण्यात आला.
त्यांच्या वतीने हा पुतळा उभारण्यात आला, हा पुतळा कोसळण्याचे कारण आपत्ती अशी की सुसाट वारा पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे, पुतळा बांधणारे कामगार जबाबदार ठेकेदार जबाबदार महाराजांचा पुतळा उभारणारे कामगार हे शिवप्रेमी नसावे शिवरायांनी जे किल्ले बांधले सागरी तटावर ते आहे.
तसेच अजून आहेत कारण महाराजांच्या मावळ्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही त्यांना तळमळ होती व राज्याबद्दल प्रेम जिज्ञासा होती महाराष्ट्र परकीय गुलामगिरीतून स्वतंत्र व्हावा ही त्यांना जिद्द होती.
म्हणून महाराजांचे किल्ले सागरी तटावर अमर राहिले, तेव्हा शेकडो वर्षे मजबूत असा किल्ला बांधण्यात यावा असे सर्व भारतीय नागरिकांची इच्छा आहे जर कोसळणारे पुतळे बांधले गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी व मावळे तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही


Discussion about this post