अतिक्रमणाविरोधात प्रताप ढाकणे यांनी बाजार समिती दणाणून सोडली
पाथर्डी-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेवगाव रस्त्यावरील गेट क्रमांक दोन समोरील अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलन चांगलेच आक्रमक झाले.
या संदर्भात अधिक असे की शेवगाव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटसमोरील जागेत मागील पाच वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आलेले आहे या संदर्भात अनेकदा अनेकांनी आंदोलन केली मात्र बाजार समितीने न्यायालयीन प्रक्रियेचा भाग पुढे करून दरवेळी या अतिक्रमणधारकांना संरक्षण दिल्याची चर्चा आहे. आज बुधवारी आठवडे बाजाराच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरविंद सोनटक्के गोरक्ष ढाकणे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे यांनी कोरडगाव रस्त्या समोरील मुख्य प्रवेशद्वारासमोर गेट बंद आंदोलन सुरू केले
यामुळे बाजार समिती प्रशासन खडबडून जागे झाले यानंतर काही काळाने तेथे पोलीस अधिकारी फौज फाट्यासह येऊन त्यांनी आंदोलकांना बळजबरीने उठविले व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गेटवर लावलेला फ्लेक्स बोर्ड फाडून काढण्याचा प्रयत्न केला यानंतर या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव ढाकणे यांच्याशी संपर्क साधला ढाकणे यांनी तातडीने तेथे धाव घेऊन बाजार समितीच्या मुख्य जालनात ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी समितीचे सभापती,उपसभापती व काही संचालक या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याशी ढाकणे यांनी चर्चा केली. बाजार समिती प्रशासन न्यायालयीन प्रक्रियेचा मुद्दा असल्याने तूर्तास अतिक्रमण काढता येणार नाही अशा भूमिकेवर ठाम राहिल्याने ढाकणे आणि आक्रमक पवित्र घेत सभागृह दणाणून सोडले.
यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे अकोल्याचे सरपंच अर्जुन धायतडक, मल्हारी घुले, महादेव दहिफळे,यांच्यासह अनेक युवक पदाधिकारी उपस्थित होते ढाकणे यावेळी बोलताना म्हणाले बाजार समितीचा शेवगाव रस्त्यावरील गेट क्रमांक दोन अनेक वर्षांपासून काही राजकीय मंडळींनी अधिकृत करून त्या ठिकाणी पक्के बांधकाम केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड अडचण होत आहे या परिसरात धान्य उत्पादक तसेच जनावरांचे व्यापाऱ्यांची येणारे ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने केवळ एकाच गेटमुळे प्रचंड अडचण होत.आमच्या ताब्यात सत्ता असताना आम्ही रीतसर ठराव करून तालुका प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्याचे रक्कमही जमा केली मात्र राजकीय वरदस्थानी ऐनवेळी ही मोहीम रद्द करण्यात आली
चार वर्षे आम्ही पाठपुरावा केला तसेच इतरांनी आणि आंदोलने केली आज संस्था न्यायालयीन प्रक्रियेचा मुद्दा पुढे करीत आहे मात्र याच अतिक्रमण धारकांनी लोकन्यायालयात स्वतःहून अतिक्रमण काढून घेतो असे लेखी दिलेले आहे त्याचे पुढे काय झाले हे स्पष्ट व्हायला पाहिजे कुणाचे आडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते कोणते राजकीय पुढारी संबंधित अतिक्रमणधारकांना खुलेआमज राजकीय संरक्षण देत आहेत हे न समजणे इतकी जनता नक्कीच खुळी नाही. राजकारणाचा विषय नाही एखाद्या व्यक्तीला राजकीय संरक्षण देऊन अयोग्य कामे पाठीशी घालने
ही तालुक्याची राजकीय संस्कृती नाही यातून जनतेचे नुकसान होते.आज एकच गेट असल्यामुळे वाहतूक कोंडी होते याला जबाबदार कुणाला धरायचे यानंतर बाजार समिती प्रशासनाने येत्या दोन महिन्यात संबंधित अतिक्रमण काढून घेऊ असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर ढाकणे यांनी पुन्हा संस्थेने दिलेली मुदत आम्ही मान्य करतो मात्र त्यानंतर अतिक्रमण निघाले नाही तर मी स्वतः ते अतिक्रमण काढून टाकीन असा गंभीर इशारा ढाकणे यांनी शेवटी दिला.
Discussion about this post