भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
शुक्रवार दिनांक ३० आगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कांदिवली येथील लालजी पाडा पोलिस चौकी,न्यू लिंक रोड,बिट क्रमांक ३ या ठिकाणी कांदिवली पोलीस ठाणेचे वतीने गणेशोत्सव व ईद ए मिलाद या येणाऱ्या सणाबाबत गणेश मंडळांनी, नागरिकांनी, मोहल्ला कमिटी सदस्य, यांनी घ्यायची काळजी बाबत विभागातील गणेश मंडळ पदाधिकारी,तलाव कमिटी, गणेश भक्त नागरिक,यांचे सह कांदिवली पोलिस ठाणे पोलीस अधिकारी, यांच्या मध्ये महत्त्व पूर्ण बैठक पार पडली.
यावेळी डीसीपी आनंद भोईटे यांनी गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी व सभासद सदस्य यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,” ज्यातून समस्या निर्माण होतात त्यावरच लक्ष ठेवून आदेश काढले जातात.निर्विघ्न पणै गणेश उत्सव पार पाडावा,मंडपात पत्ते खेळू नये, मंडपात मूर्ती समोरील भागात नैवेद्य उघडा ठेऊ नये.मांजर,कुत्रे,व इतर प्राणी पिढा करतील, त्रास देतील.महिला, लहान मुले, जेष्ठ नागरिक यांचे बाबत जागरूकता पाळावी लागेल.” यावेळी कांदिवली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गैणोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,” रुग्णांना, विद्यार्थी यांना त्रास होईल असा स्पिकरचा आवाज ठेऊ नये.सार्वजनिक पिढा , त्रास होईल एवढा आवाज ठेऊ नये.
याकडे मंडळ पदाधिकारी यांनी लक्ष ठेवावे.गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणूक वेळी वाहनांची कागदपत्रे परिपूर्ण असावी.पावसाळा असल्याने उघडी वायर ठेऊ नये.डीजे वाद्य वाजवू नये.वाद्य,स्पिकर रात्री १० वाजेपर्यंत वाजविण्यास परवानगी असेल, ठराविक दिवशी वाढविण्यात येईल.यावेळी कांदिवली विभागातील गणेश मंडळ पदाधिकारी यांनी आपल्या समस्या सांगितल्या व त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली.या बैठकीत डीसीपी आनंद भोईटे, कांदिवली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गैणोरे, निंबाळकर,व इतर पोलिस अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते, या बैठकीत श्री सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ चे प्रमुख सल्लागार जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार भारत कवितके उपस्थित होते.
Discussion about this post