वडवणी:-प्रतिनिधी -प्रकाश शेंडगे.
दि :-30/8/2024.
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 सप्टेंबर ला तेलगाव येथे माजलगाव विधानसभा मतदार संघात जनजागृती बैठक होणार आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली तुन चालू केलेला मराठा आरक्षण लढ्या ला एक वर्ष होऊन गेलं पण सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. पण त्यामुळे सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, आज एक वर्ष झालं आहे तरीही अजून लढा चालू आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकविण्याचाही निर्धार व्यक्त केला आहे. ही आरपारची लढाई असेल यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाज काय करू शकतो हे दाखवण्यासाठी 6सप्टेंबर ला तेलगाव येथे सर्व सकल मराठा समाजाने यावे ही विनंती करण्यासाठी वडवणी तालुक्यातील मराठा आरक्षण चळवळीत अग्रेसर असलेले मराठा सेवक संतोष दादा डावखर, संदीप शिंदे, माऊली आगे,गीतेश आगे,शामबाबा जाधव,व इतर मराठा सेवक यांनी सकल मराठा समाज तिगांव याच्याशी रात्री सात वाजता संवाद घेऊन मार्गदर्शन केले व 6 सप्टेंबर ला तेलगाव येथील मनोज दादा जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीला सह कुटुंब सह परिवाराने यायचं आहे असं या बैठकीत ठाम मताने ठरवले आहे.
तिगांव चे शहादेव शेंडगे यांनी सकल मराठा समाज तिगांव च्या वतीने आलेल्या सर्व मराठा बांधवांचे आभार व्यक्त करून निरोप दिला.
Discussion about this post