परंड्यातील मेळाव्यातून ४९० जणांना मिळाला रोजगार
४६ कंपन्यांनी नोंदविला सहभाग
परंडा : शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळावा पार पडला. यात तब्बल ४९० पात्र विद्यार्थ्यांना डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गौतम लटके, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, भूम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्तात्रय मोहिते, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, माजी नगरसेवक वाजीद दखनी, पैलवान माऊली गोडगे, माजी नगरसेवक वैभव पवार, भूम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नीलेश शेळवने, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना दराडे, बाळासाहेब गायकवाड, बालाजी नेटके आदी उपस्थित होते, उद्योग, सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित ४६ कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला. यावेळी इयत्ता पाचवी ते सर्व पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये ११३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नाव नोंदणी केली होती. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ४९० पात्र विद्यार्थ्यांना डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या रोजगार मेळाव्याचे आयोजन पैलवान विशाल देवकर व धनंजय सावंत मित्रपरिवार यांच्याकडून करण्यात आले होते.
Discussion about this post