रेशनकार्डधारकांना ऑफलाइन धान्य वाटपाचे निर्देश.
दिवटे प्रतिनिधी:-(दि.३)
बोधेगाव:गेल्या काही दिवसांपासून धान्य वितरण प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून हाेणारे वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. पुरवठा विभागाला आयएमपीडीएस पोर्टलद्वारे ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस यंत्रावर अंगठा न टेकवता देखील धान्य मिळू शकणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड अद्यापही कायम.
जुलै महिन्यांतील धान्य मिळण्यासाठी लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यामुळे वाटप कसे करावे, असा प्रश्न दुकानदारांसमोर निर्माण झाला होता. सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड अद्यापही कायम आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे लॉगिन आयएमपीडीएस पोर्टलवर तयार करण्यात येणार आहेत. सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत ऑफलाइन धान्य वितरणास परवानगी देण्यात आली आहे. ऑफलाइन धान्य वितरणाची नोंद एका रजिस्टरमध्ये करण्यात येणार आहे.
Discussion about this post