परिचय
मौजे येळणूर ता निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेल्या पार्वतीबाई गोविंद कांबळे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दि.०४ बुधवार रोजी पहाटे ०४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
अंतीमसंस्कार
पार्वतीबाई कांबळे यांच्या पार्थिवदेहावर येळणूर येथे दुपारी ०२ वाजता अंतीमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
कुटुंबातील व्यक्ती
त्यांच्या पश्चात्त १ मुलगा, सूना, नातवंडे, व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाला कायमच आधार दिला व मार्गदर्शन केले.
त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो, हीच प्रार्थना सर्व गावकरी व त्यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे.
Discussion about this post