
विरार च्या सेवेन सी रिसॉर्ट वर महानगरपालिकेने कारवाई केल्यावर . मागील दोन दिवसांपासून अनेक रिसॉर्ट ही बंद आहेत .
तर काही रिसॉर्ट चालू देखील आहेत. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की कारवाई थंडावलेली आहे !
परंतु पुन्हा कारवाई करण्याची माहिती वसई तहसीलदार ह्यांनी दिली .नावपूर येथील जी रिसॉर्ट शासकीय जागेवर अनधिकृतपणे बांधलेली आहेत
अश्या सर्व रिसॉर्ट वर कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. गुरुचरण जागेवरती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे नोटिस
बजावणी झालेली आहे. आता त्याचा नुसार त्याच्यावर कारवाई देखील होईल असे वसई तहसीलदार ह्याच्याकडून सांगण्यात आले .
व समुद्र किनारपट्टीवर जितके अनधिकृत रिसॉर्ट आहेत 20 ते 22 रिसॉर्ट त्याच्यावर ही कारवाई केली जाईल. पोलिस प्रशासन यांच्या
जवळून मनुष्यबळ व अजून काही आवश्यक सादन सामग्री आहे .ह्याची मागणी देखील केलेली असे सांगण्यात आले. व त्याच प्रमाणे
मोठी कारवाई होणार असे सांगण्यात आले आहे.
Discussion about this post