प्रतिनिधी :राकेश धनगर
संपर्क :-८२०८५३६८८७/७७९८९४९१३६

पाळधी दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरा करण्यात आली तसेच लहान पासून तर मोठे विद्यार्थी यांनी आपल्या भाषणा द्वारे आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे जी. पी. एस कॅम्पस चे संचालक प्रतापरावजी पाटील, संस्थेचे अध्यक्ष विक्रम गुलाबरावजी पाटील, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख ज्योती राणे मॅडम इंग्लिश मिडीयम चे प्रिंसिपल श्री नरेंद्र मांडगे सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख राणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या जीवन परिचय आपल्या भाषणातून करून दिला. व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कविता सादर केली..(माझी मैना गावावर राहिली..) तसेच प्रिंसिपल मांडगे सर यांनी लोकमान्य टिळक यांचा जीवनाचा परिचय दिला.आजचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रोशनी चौधरी व कामिनी बोरसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक राकेश धनगर सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Discussion about this post