मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारात मंगळवारी दि.10. सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कार दुचाकीचा अपघात झाला या घटनेमध्ये दुचाकी वरील पती गंभीर जखमी झाला तर पत्नीचा मृत्यू झाला आहे.
या अपघाता विषय अधिक माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग 61 वर ताड बोरगाव शिवारात एम एच ४५ एन ३९७७ ही कार आणि एम एच 22 ए.टी 33 65 या क्रमांकाच्या दुचाकी मध्ये अपघात झाला अपघातात मीरा प्रभाकर अवचार वय 40 वर्ष राहणार देऊळगाव अवचार या महिलेचा मृत्यू झाला.
तर प्रभाकर दत्तराव अवचार जखमी झाले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच.पोउपनि. नागनाथ पाटील. बीड जमादार शक्ती नेताम. अतुल पाचंगे. दत्ता माने. इंगळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. परभणी नगरी न्युज राजकुमार शर्मा
Discussion about this post