कुरुंदवाड/ पोलिस ठाणे अंतर्गत गणेशोत्सवा निमित्त 27 गावांमधील 10 जणांना हद्दपार करण्यात आले असून 25 जणांवर 107 कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनी रविराज फडणीस यांनी दिले.
कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत गणेश उत्सवा निमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनी दहा जणांना हद्दपार केले आहे. 25 जणांवर 107 कलमांतर्गत कारवाई करण्यात आले आहे या कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील पाच गुन्हेगारांना ॲडिशनल एस पी कार्यालय येथे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेले आहे.
गणेश उत्सवानिमित्त कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत 27 गावांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गणेशोत्सव काळामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करावे अशा सूचना कुरुंदवाड पोलिसांनी दिलेल्या आहेत.
Discussion about this post