वाशिम प्रतिनिधी प्रवीण जोशी(9028428149) वाशिम येथून जवळच असलेल्या रिठद येथे श्री संत गजानन महाराज शैक्षणिक व आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कापसापासून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे त्यामुळे रिठद येथील भाविक भक्तां ची बाप्पांना बघण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी उसळत आहे.
श्री संत गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी पर्यावरण पूरक गणपती बाप्पा साकारला जातो यावर्षी कापसा पासून बनवलेल्या या मूर्तीची उंची सात फूट असून रुंदी साडेतीन फूट आहे मूर्ती बनवताना कापूस व धाग्याचा वापर करून मूर्ती साकारली गेली आहे. सर्वत्र या मूर्तीबद्दल कुतूहल व्यक्त होत आहे.
वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष ह भ प संतोष महाराज शिंदे वं त्यांच्या धर्मपत्नी ह भ प सौ अनुसूयाताई शिंदे तसेच संस्थेतील विद्यार्थी शिवा काळबांडे यश कालापाड कृष्णा कालापाड केतन मोसंबे जय जाधव प्रशांत शेजुळ गजानन खोरणे श्रेयश चौधरी पांडुरंग झाडे योगेश काळबांडे विनायक माळेकर श्रद्धा काळबांडे वैष्णवी काळे आरोही शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले….
Discussion about this post