सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
शिक्षक दिनानिमित्त संभाजीनगर येथे सीईओ विकास मीना यांच्या हस्ते जिल्ह्यातील गुणवत्ता पूर्ण शाळांना पुरस्कार दिले. त्यामध्ये वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेस नवोपक्रमशील व गुणवत्ता पूर्ण शाळा हा पुरस्कार मिळाला.
सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले.
यावेळी सरपंच उषा सुर्यवंशी, उपसरपंच संतोष सूर्यवंशी, सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी, शालेय व्य. समिती अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, सदस्य हरिभाऊ सूर्यवंशी, आप्पासाहेब दिवेकर, गणेश सूर्यवंशी आजिनाथ सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी तसेच मुख्याध्यापक सोनटक्के सर, उबाळे सर, ठुबे सर, वाडीले सर, रन येवले सर, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती शाळेत २ गुंठे घनवन आहे. याचे संगोपन, निगा, झाडा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे, नवीन झाडे लावणे, त्यांना पाणी घालने, शाळेत विविध स्पर्धा आयोजित करणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, धार्मिक कार्यक्रम घेणे या सहभागातून शाळेस हा पुरस्कार मिळाला आहे.
Discussion about this post