दिंद्रुड (रिपोर्टर):
दिंद्रुड शहरांमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढत होऊ घातलेले गणेश उत्सव, ईद ए मिलाद हे सण शांततेत व आनंदाने साजरे करावे असे आवाहन केले.
सध्या गणेश उत्सव सुरू असून ईद-ए-मिलाद हा सण देखील येत आहे हे दोन्ही सण शांततेत व आनंदाने साजरे करण्याचे आवाहन दिंद्रूड पोलीस बांधवांनी रूट मार्च करून केले आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ धीरज कुमार यांच्या सूचनेप्रमाणे गावातील मार्केट रोड ते जुने बस स्थानक असा रूट मार्च काढण्यात आला. गणेश उत्सव व ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर दिंद्रुड पोलीस प्रशासन सज्ज असून सर्वांनी उत्सव शांततेत साजरा करावा कोणत्याही प्रकारचे नियम भंग करू नये.
नियम भंग करणारे व कायदा मोडणाऱ्या वर कठोर कारवाई केली जाईल असे सहायक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी सांगितले.
Discussion about this post