
राज्याचे आरोग्य मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी ही घटना घडली.
दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले आणि त्यांनी सावंत यांच्या घरासमोर गोळीबार केला असल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने केला आहे. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीनुसार, गोळीबारानंतर या दोन्ही अज्ञात इसमांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
Discussion about this post