
श्रावणानिमित्त रामलिंग मंदीर परिसरात मोठी यात्रा भरते. बीड, सोलापूर, लातूर तसेच विविध जिल्ह्यातून भाविक या निसर्गरम्य ठिकाणी गर्दी करतात. मात्र ही यात्रा संपून 15 दिवस उलटून गेले तरी या परिसराची स्वच्छता करण्यात आलेली नाही. निसर्गाने नटलेल्या या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
येथील येडशी ग्रामपंचायतीच्या मार्फत येथे येणाऱ्या भाविकांकडून पार्किंगचे पैसे आकारले जातात. मात्र ग्रामपंचायतीकडून सुद्धा हा कचऱ्याचा प्रश्न सोडवला जात नाही. कचरा वेळेत उचलला न गेल्यामुळे वाऱ्यामुळे हा कचरा डोंगर कपारीत जाऊन बसतो. तो कचरा गोळा करणे ही फार मुश्किल गोष्ट आहे. हा कचरा पाहून येथे येणाऱ्या भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्याला रामलिंग मंदीर परिसराच्या रूपाने निसर्गरम्य पर्यटनस्थळ लाभलेलं आहे. मात्र येथील जनता या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही.
Discussion about this post