बुलढाणा महाफ़ॉरेस्ट विभागाचा काळा कारनामा -रक्षकच भक्षक झाल्याची शंका
ता. प्रतिनिधी -देविदास वायाळ
बुलढाणा महाफ़ॉरेस्ट विभागीतील मेहकर वनपरीक्षेत्रातील बीबी बिट मधील पोफळशिवनी येथील क. नं. 596 वनखंड, व टिटवी बिट मधील सावरगाव मुंढे क. नं. 583,खूरामपूर क. नं. 577,धाड क. नं. 577 व 578,मढी क. नं. 214 व 215, गंधारी क. नं. 213 वनखंड वरील मागील 4 वर्षातील खर्च माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून मिळालेल्या निधीमधून कॅम्पा अंतर्गत रोपवन,मृद व जलसंधारण, इतर विकासाकामावर पोफळशिवणी अंदाजे 77 लाखापेक्षाही जास्त आणि सावरगाव मुंढे, खूरामपूर, धाड, मढी, गंधारी येथील वनखंड वर दर्शविल्याप्रमाणे अनुक्रमे – 583,577,578,213,214 व 215 वरील खर्च अंदाजे 2 कोटी 95 लाखापेक्षाही जास्त खर्च करण्यात आलेला आढळला असून अक्षरशः वरील वनखंड मध्ये एवढी विकासकामे झालेली दिसत नसून महाघोटाळा झाल्याचा अंदाज आहे.येथे रक्षकच भक्षक झाल्याची शंका नाकारता येत नाही.तरी संबंधित मुख्यवनसंरक्षक यांनी वरील अनुक्रमे दिलेल्या वनखंड मधील न झालेल्या विकास कामांबद्दल महाघोटाळ्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी समिती नेमून चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांचेवर कार्यवाही करावी.
Discussion about this post