पांढरकवडा : यवतमाळ जिल्हा ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजीत जिल्हा क्रीडा नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या ॲथलेटीक्स खेळामध्ये गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करीत पुणे येथे होणाऱ्या स्पर्धे करीता आपले नाव कोरले.
यामधे वेद देठे,अर्णव ईसाळ,श्रिवेद जयस्वाल,अरकम खान,प्रणितसिंग कपूर,गितार्थ सत्तुरवार,आर्यन वाघमारे,लाभश्री पाटील,श्रावणी वखरे,रूद्रायणी समरीत,सोहम जाधव आणि आयुष बाजोरिया यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ.अभिनय नहाते,सचिव नरेंद्र नार्लावार,संस्थाचालक मदन जिड्डेवार,राजेश सातुरवार,नितीन उत्तरवार,प्रा.डॉ.प्रदिप झिलपिलवार,शाळेचे प्राचार्य स्वप्निल कुळकर्णी व उपप्राचार्य अमित काळे,क्रीडा शिक्षिका नाझिया मिर्झा व शितल मल्लेलवार यांनी भरभरून कौतुक करीत विद्यार्थ्यांच्या पुढील यशाकरता शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे शिक्षक व पालक यांना देतात.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाकरिता सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे,
Discussion about this post