✒️ प्रवीण इंगळे
(उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.7798767266
उमरखेड:- (दिनांक १३ सप्टेंबर) जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या अनेक मागण्या प्रलंबित असून या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदने, आंदोलने व विनंती करूनही न्याय मागण्या व आर्थिक सेवाविषयक मागण्या सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग उमरखेड यांनी काल दि. ११ सप्टेंबर रोजी येथील तहसील कार्यालय येथे तलाठी डीएससी व लॅपटॉप जमा केले आहे.
जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील तलाठी संवर्गातील अनेक मागण्या प्रलंबित असून याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वेळोवेळी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखेतर्फे यापूर्वी जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेली सेवा ज्येष्ठता यादी, कालबाह्य झालेले लॅपटॉप व प्रिंटरच्या ऐवजी नवीन लॅपटॉप व प्रिंटर देण्यात यावे, यावर्षी झालेल्या – सार्वत्रिक प्रशासकीय बदली मधील अनियमितता दूर करण्यात यावी.
तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली.
विनंती बदली, मराठा आरक्षण मेहताना, अनुदान वाटप व इतर अनेक महत्त्वाच्या प्रलंबित जिल्हा व उपविभागीय स्तरीय मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्याने पटवारी संघटनेने कालबाह्य लॅपटॉप व डिएससी जमा करून आंदोलनास सुरुवात केली. यानंतरही प्रशासनाने योग्य तो तोडगा न काढल्यास दि. २४ सप्टेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे.
असे निवेदन यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने तलाठी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला दिसून येतो. तलाठी संवर्गास दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र होऊ शकते.
हे आंदोलन विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग उमरखेड संघटनेचे अध्यक्ष राजकुमार गरुडे, उपाध्यक्ष आय जी चव्हाण, सचिव शरद रायपूरकर, सहसचिव कुमारी के के माखणे, कोषाध्यक्ष जी एस मोळके उपविभागीय पदाधिकारी हे सर्व सभासदांसह करीत आहेत.
Discussion about this post