लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात बाळासाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी समन्वयाचे महत्त्वपूर्ण बैठक हरिबाई देवकरण प्रशाला या ठिकाणी पार पडली. या बैठकीनंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांमध्ये बैठकीला दांडी मारणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुख यांची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हरीभाई देवकरण प्रशाला येथे पार पडली. ही बैठक अत्यंत महत्त्व ची असून त्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्त्यांनी शंभर टक्के उपस्थिती राहणे अनिवार्य असल्याची सक्त सूचना राष्ट्रीय सेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेली असताना या बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख हे गैरहजर असल्याचे दिसून आले.
या बैठकीला संघाचे पुणे विभागीय कार्यवाहक मुकुंदराव कुलकर्णी प्रवीण दबडगावकर आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी आमदार राम सातपुते माजी महापौर शोभाताई बनशेट्टी मध्य विधानसभा अध्यक्ष मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेले पांडुरंग दिंडी दक्षिण सोलापूर मध्ये इच्छुक असलेले उदय पाटील आधी इच्छुक आणि दावेदार आमंत्रित होते.
काही कार्यकर्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीच्या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गैरहजरची फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. तेथेच शहर उत्तर मधल्या एका जबाबदार स्वयंसेवकाने अशा बैठकींना मालक महत्त्व देत नाहीत अशी नाराजी व्यक्त केले. संघ परिवाराची इतकी महत्त्वाची प्रदेश पातळीवरील नेत्यांसह बैठक सोलापूरत असूनही उपस्थित राहत नाहीत.
संघाचे स्वयंसेवक व परिवारातील कार्यकर्ता लोकसभा असो किंवा विधानसभा जणू आपल्या घरातील लग्न असल्यासारखे पळतात. देव देश धर्मासाठी निस्वार्थ भावनेने काम करतात मात्र संघटनेच्या हिंदुत्वादी कार्य बळावर लोकप्रतिनिधी झालेले लोक मात्र स्वतःला मालक समजू लागलेत. ही बैठक आहे ती माझ्यासाठी नाही मी वेगळं स्वातंत्र्य बैठक लावीन आणि स्वयंसेवक संघाला संपूर्ण माझ्याकडे बोलावून घेईन ही भूमिका माध्यमाकडे कधीही न व्यक्त होणारे आमदार डायरेक्ट प्रेसला व्यक्त करतात! त्यांच्या या गैरहजेरीचं आता संघ श्रेष्ठ आणि भाजपा श्रेष्ठी नेमके कशी दखल घेतात हे बघावे लागेल असा एक ज्येष्ठ कार्यकर्ता हताशपणे बोलताना दिसला.
त्याचवेळी साखर पेठेतील एक स्वयंसेवक साखरपेठाच्या जागेवरती वकफ बोर्डाचे नाव लावले आणि ती जागा फक्त बोर्डाची आहे. महापालिकेकडून येथील नागरिकांना बांधलेले घर तर सोडा साधा घराच्या किरकोळ दुरुस्तीची सुद्धा परवानगी देत नाही. ही तक्रार घेऊन शहर उत्तरचे आमदाराकडे गेले असता शहर उत्तरचे आमदार त्याने त्यांचे कडे दुर्लक्ष केले अशी ही नाराजी व्यक्त करण्यात आले समजते. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून संघ परिवार व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जीवावर भाजपच्या तिकिटा वरती आयते निवडून घटना म्हणून असलेल्या मालकशाही वृत्तीच्या देशमुख मालकांला संघाचे महत्व कसे कळणार ?
ही व्यक्ती संघाच्या बैठकीला जाण्याऐवजी संघालाच मी बैठकीला बोलवतो म्हणणे इतपत त्यांची आज मजल गेलेली आहे. त्यांना भाजपचा आमदार म्हणून घेण्यापेक्षा देशमुख मालक म्हणून त्यांनी सोलापूरच्या भाजपच्या व स्वयंसेवक संघाच्या जुन्या कार्यकर्त्याची अक्षरशा वाट लावली आहे. आज पिढीच्या कार्यकर्त्यांनी मी भाजपा किंवा संघाचा कार्यकर्ता म्हणून घेण्याऐवजी भीतीपोटी मालकाचा कार्यकर्ता म्हणून घेतो. यापेक्षा दुर्दैवी कोणते ?
आज पर्यंत संघाची बैठक टाळणे म्हणजे अक्षम्य अपराध केल्याची भावना असे व आजही संघा मध्ये हीच भावना आहे आता तर मालकाला ना संघाची भीती आहे ना पक्षाची भीती आहे. माझे तिकीट कन्फर्म आणि आपल्या शिवाय दुसरा कोण याच मिजाशीत आहेत. माझ्याशिवाय भाजपच्या कोणत्याही व्यक्तीला मोठे होऊ द्यायचे नाही अशी हिणकस मनोवृत्ती बाळगणाऱ्या कडून संघ अजून काय अपेक्षा ठेवणार आहे. आता संघाची परीक्षा आहे आता देशहिताला महत्त्व द्यायचे की देशमुखला.
Discussion about this post