फुलंब्री प्रतिनिधी .अमोल कोलते महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परिषदे तर्फे 5 सप्टेंबर सन 2024 ला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावले अशा शिक्षकांना शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्यात सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.अनिल मोरे हे एम.ए.इंग्रजी , एम. ए. शिक्षणशास्त्र (एम. एड),एम.ए.रुरल डेव्हलपमेंट,बी.एड.,डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन योगा टिचर & नॅचरोपॅथी असे उच्च शिक्षण प्राप्त असून इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून 1 ते 7 वर्गांचे सात वर्षे जिल्हा व तालुका स्तरावर उत्कृष्ट तज्ञ मार्गदर्शक तसेच एस. एस. सी बोर्डात परीक्षक, नियामक, मुख्य नियामक व त्रिस्तरीय समितीत प्रदीर्घ काळ उत्कृष्ट रित्या काम व 31वर्षे विद्यालयात सेवा करून नामांकित डॉक्टर, वकील, इंजिनिअर. पी. एस. आय. (करण नांगलोत, विल्हाडी) तसेच रोहित भोवते (एम.बी.बी.एस., रशिया) धनंजय सोळुंके (ॲनिमेशन दुबई) विकास देशमुख (जर्मनी)अशी विदेशात हि विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे.
तसेच संभाजीनगर शहरात प्रा. आकाश साळुंके व सुहास सोळुंके यांचे नामांकित विद्यालंकार क्लासेस व प्रा. भगवान फुके राजमुद्रा क्लासेस चे संचालक हे सुद्धा प्राचार्य श्री. अनिल मोरे सरांचे विद्यार्थी आहेत. अशा प्रकारे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव शाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विकासासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
त्याबद्दल मा. समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे साहेब व साजिद पटेल सचिव यांनी कार्याची दखल घेऊन परिषदेतर्फे प्राचार्य अनिल मोरे यांना शिक्षक सन्मान पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी मोरे सरांनी मा.समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे साहेब व परिषदेचे सचिव मा. साजिद पटेल साहेब यांचे हार्दिक आभार मानले व यानंतरही अविरतपणे काम करत राहणार असे मत व्यक्त केले.
त्यांच्या ह्या यशाबद्दल सरस्वती विद्यालय तळेगाव संस्थेचे अध्यक्ष मा. कैलास पाटील गव्हाड व संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, पालक, गावकरी , आप्तेष्ट व मित्र परिवार यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
Discussion about this post