धुळे (भारत देवरे)समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील 2273 शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक शिक्षक (Computer Instructor) सुद्धा रुजू करण्यात आलेले आहे,तांत्रिक शिक्षणाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही
त्यात संगणक महत्वाची भूमिका बजावित आहे.संगणकाच्या साहाय्याने विद्यार्थ्याची स्वयं अध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते,तसेच क्रमांन्वित अध्ययन पद्धतीचा वापर करता येतो. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला मॅडम यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे.
यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यातील 61 शाळेमध्ये हा उपक्रम चालू असून, अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती आर विमला यांच्या सूचनेप्रमाणे व धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. बी.एस. अकलाडे (प्राथ.) यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे, तर येणाऱ्या काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
अधिक बातम्यांसाठी सम्पर्क करावा सारथी महाराष्ट्र चा भारत देवरे 8888209933 ,8830599961
Discussion about this post