
डहाणू , येथे सूर झलकारी कातकरी एकता महासंघ महाराष्ट्र राज्य. या संघटनेचे संस्थापक रमेश सवरा साहेब यांच्या मार्गदर्शनाने डहाणू तालुका अध्यक्ष श्री.गणेश काकड्या गावित यांच्या अध्यक्षतेखाली कातकरी वस्ती असलेल्या पाड्यात जावून गाव कमिटी बनवण्यात आल्या.त्या साठी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद बघायला मिळाला.
गाव कमिट्या बनवण्याच्या मुख्य उद्देश संघटना बांधणी व लोकांच्या समस्या सोडवणे असा असून बरेच असे पाडे आहेत. की तेथे अजून सोय सुविधा नाहीत.कातकरी समाजावर सरकार मुख्यतो जास्त त्याच लक्ष देत आहे असं असल तरी सुद्धा अजून ही वीज, रस्ते, अंगणवाडी, शाळा, योजना, विविध कागदपत्र ,स्थलांतरण असे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्या अडचणींना मात करण्यासाठी मागील ऑगस्ट महिन्या पासून अनेक गावातील कातकरी समाजातील वस्ती असलेल्या ठिकाणी जावून गाव कमिटी बनवण्यात आल्या आहेत. तसेच १६ नोव्हेंबर रोजी निकणे ग्रुप ग्रामपंचायत मधील शेल्टी येथे गाव कमिटी गठित करण्यात आली. या कमिटी अध्यक्ष नरु सवरा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कमिटी मध्ये उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सल्लागार व सभासद असे वेगवेगळे पद देण्यात आली.गावात कमिट्या बनवण्यात आल्या.

अश्या एकूण १७ ग्रामपंचायती असलेल्या गावांना गाव कमिटी बनवण्यात आल्या. कमिटीचे गाव कमिटी अध्यक्ष
निकणे- सिताराम मिसाळ, सारणी – सुरेश भोये, रायतळी – महेश पवार, गंजाड- रत्नाकर गावित, रनकोळ- सुनिल भोये, वेती- सुरेश पवार, रानशेत- अंनता नडगे ,कासा – दिलीप सवरा, खानिव – अजय पवार, शिलोंडा – किरण सुबर, निंबापूर – एकनाथ पवार, विवळवेढे – विलास भोये, वधना- दिलीप आरडी, देवगाव – रणजित पवार, चरी- पावन- संदीप कुवरा, गंजाड मानीपाडा – गोविंद तुंबडा असे सर्व गावातील गाव अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आल्या. व राहिलेल्या गावांना लवकरात लवकर बनवणार असल्याचे कळले.
तसेच सर्व गाव कमिटी बनवण्यासाठी तालुका कमिटी ला गाव कमिटी बनवण्यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच लोकांच्या वेळेत जावून बांधणी करण्यात आली. याचा फायदा अडचणींना मात करण्यासाठी होणार असल्याचे तालुका कमिटी कडून समजले.डहाणू तालुका कमिटी अध्यक्ष गणेश गावित, उपाध्यक्ष संतोष घाटाळ, सचिव दिलीप पवार, सहसचिव अनिश मिसाळ, सल्लागार देवू गावित, सभासद विलास सवरा, काळूराम घाटाळ, आदी.सभासदांचा मोठा सहभाग घेऊन कमिटी बनवण्यात आल्या.

Discussion about this post