इचलकरंजी/ कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी मधुकर मुसळे (बापू) यांची निवड झाल्याबद्दल अनिकेत शिंदे (कार्टून आण्या) यांनी बापू यांच्या राहते घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या
रील स्टार अनिकेत शिंदे (कार्टून आण्या) यांच्या वतीने (बापू) यांचा सत्कार करण्यात आला. मधुकर मुसळे (बापू) हे खासदार धैर्यशील माने यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.
मधुकर मुसळे (बापू) यांचें सामाजिक, राजकीय, औद्योगिक, क्षेत्रामध्ये मोठे कार्य आहे. कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवडीसाठी खासदार धैर्यशील माने यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
नुकतीच कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची बैठक खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याचे औचित्य साधून रिल्स स्टार अनिकेत शिंदे कार्टून (आण्या) यांच्यावतीने मधुकर मुसळे (बापू) यांचा विमानतळ सल्लागार समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनिकेत शिंदे (कार्टून आण्या), अमित शिंदे आणि त्यांचे सहकारी मित्रपरिवार उपस्थित होते.
Discussion about this post