कुरुंदवाड/ शहरातील प्रबुद्ध भारत नगर रिंग रोड येथील सरकारी संडास बाथरूम च्या मागील बाजू परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करत गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एक जनास ताब्यात घेतले.
अधिक माहिती अशी प्रबुद्ध भारत नगर रिंग रोड येथील सरकारी संडास बाथरूमच्या मागील बाजूस भैरवाडी परिसरातील इसम प्रशांत मनोज आमते गावठी हातभट्टी तयार दारू विक्रीसाठी 90 मिली प्लास्टिक पाऊच मध्ये एक गोणी जवळ बाळगून विक्री करत असल्याचे माहिती मिळतात.
रविवार रोजी दुपारच्या दरम्यान कुरुंदवाड पोलीस ठाणे च्या पथकाने छापेमारी करून अंदाजे 760/- रुपयांची गावठी हातभट्टी दारू ताब्यात घेतली आहे. भैरवाडी परिसरातील प्रशांत मनोज आमते यांच्याकडून 760 रुपये किंमतीची हातभट्टी दारू जप्त करून कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कराडे करत आहेत.
मागील आठवड्यात दत्तवाड गावातील अवैध व्यवसाय करणारा नूर काले यास येरवडा जेल पुणे येथे कुरुंदवाड पोलिसांनी एक वर्षा साठी स्थानबंद केले.
त्यानंतर लगेचच आज प्रबुद्ध भारत नगर रिंग रोड येथील सरकारी संडास बाथरूम च्या मागील बाजूस विना परवाना हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या प्रशांत मनोज आमते यावर कारवाई केल्याने कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय कणार्यांचे धाबे दणाणले आहे.
Discussion about this post