• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“संख–उमदी अप्पर तहसीलदार कार्यालये स्वतंत्रच; अफवांवर विश्वास ठेवू नका — आमदार गोपीचंद पडळकरांचे नागरिकांना आवाहन”

by
December 11, 2025
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

जत प्रतिनिधी :-जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनो,

आपण मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिल्यानंतर माझी जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा उंच आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

विधानसभा सदस्य होण्यापूर्वी, मी विधानपरिषद सदस्य असताना संख अप्पर तहसीलदार कार्यालयातील काही गावांचा उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये समावेश करण्याची मागणी तत्कालीन सरकारकडे सातत्याने करत होतो. त्यानुसार उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळाली.

मार्च 2024 मध्ये महसूल मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती. संख व उमदी भागात पूर्वीपासून काही संबंधित विवाद होते. त्यामुळे उमदी परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी होती की उमदी येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू व्हावे.

त्या अनुषंगाने नव्याने प्रस्तावित उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी २२ गावांचा समावेश करण्यात आला असून त्यात पुढील गावे येतात:

उमदी, विठ्ठलवाडी, उटगी, लमाण तांडा उटगी, निगडी बुद्रुक, सुसलाद, सोनलगी, बोर्गी खुर्द, अक्कळवाडी, मानिकनाळ, बोर्गी बुद्रुक, बालगाव, हळ्ळी, करजगी, बेळोंडगी, जाडर, बोबलाद, सोन्याळ, लकडेवाडी, गिरगाव, लवंगा, गुलगुंजनाळ, जालीयाळ बुद्रुक.

उमदी अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्यानंतर संख अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे एकूण 29 गावे निश्चित झाली आहेत. त्यामध्ये:

संख, गोंधळेवाडी, खंडनाळ, दरीबडची, लमाणतांडा दरीबडची, आसंगी तुर्क, कागनरी, मोटेवाडी आसंगी, धुळकरवाडी, अंकलगी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, जालीयाळ खुर्द, पांढरेवाडी, तीकोंडी, पांडोझरी, पारधेवस्ती, करेवाडी तीकोंडी, कोंतेव बोबलाद, करेवाडी (को. बो.), मोटेवाडी (को. बो.), कोणबगी, मोरबगी, भिवर्गी, माडग्याळ, व्हसपेठ, गुड्डापूर, आसंगी जत, तिल्ल्याळ यांचा समावेश आहे.

माझा स्वभाव कुणावर अन्याय करण्याचा नाही. सर्व घटकांना न्याय देण्याच्या तत्त्वाप्रमाणेच ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे.

संख येथे विविध शासकीय सुविधा आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत. यामध्ये

संख येथे सरकारी हॉस्पिटल – प्रस्तावित असून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात.

संख येथे रेशीम प्रशिक्षण व उद्योग केंद्र – यासाठी वस्त्र उद्योग मंत्र्यांकडे मागणी सादर केली आहे.

राज्य सरकार सातत्याने संखसाठी आवश्यक ते निर्णय घेत आहे आणि आणखी काही निर्णय लवकरच अपेक्षित आहेत.

जनतेला केंद्रस्थानी ठेवून, न्याय, सुविधा आणि प्रशासन सुलभतेचा ध्यास घेत मी कार्य करीत आहे.
आपला विश्वास हीच माझी मोठी ताकद आहे.

Previous Post

दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांची पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी फेर नियुक्ती करण्यात आली

Next Post

ग्रामपंचायत भ्रष्टाचार संदर्भीय क

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
51
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post

ग्रामपंचायत भ्रष्टाचार संदर्भीय क

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In