खरीप हंगामासाठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; शेतकऱ्यांना ॲप अद्ययावत करण्याचे आवाहन
दिवटे प्रतिनिधी :-सुधीर जावळे
सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी नोंद मोबाईलद्वारे सुरू करावी. शेवगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी व्हर्जन ॲप अद्ययावत करून नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
प्रात्यक्षिक दाखवणार.
मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी केल्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास पीकविमा मिळवण्यासाठी मदत होते. ऑनलाइन ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे महसूल पंधरवडा १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत गावचे तलाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे व वापरावे याचे प्रात्यक्षिक दाखवून मदत करणार आहेत. शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास गावातील तलाठ्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
Discussion about this post