प्रतिनिधी :संजय फलके, शिरूर तालुका*
भांबर्डेच्या वि.का. सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दशरथ पिंगळे यांची बिनविरोध निवड.
भांबर्डे (ता.शिरूर) येथील श्री मळाबाई अंबिका वि. का.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दशरथ पिंगळे तर उपाध्यक्षपदी निलिमा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.
यापूर्वीचे अध्यक्ष नाथू वीर आणि उपाध्यक्ष आण्णा तिरखुंडे यांनी राजीनामा दिल्याने या दोन पदासाठी निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी दशरथ पिंगळे तर उपाध्यक्षपदासाठी नीलिमा देशमुख यांचे हे दोन अर्ज आले त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याची सहाय्यक निबंधक अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी जाहीर केले. दशरथ पिंगळे हे सेवानिवृत्त जिल्हा विशेष लेखा परीक्षक चांगदेव पिंगळे यांचे ते बंधू आहेत.
“विविध कार्यकारी सोसायटी ही शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आर्थिक कणा असून त्यासाठी शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.”
दशरथ पिंगळे
नवनिर्वाचित अध्यक्ष
यावेळी संचालक नाथू वीर, आण्णा तिरखुंडे, हनुमंत पवार, मारुती म्हस्के, बापू पवार, सुमन वीर, संदीप वीर, विजय पवार, तुकाराम रोडे, बाळासाहेब खेडकर, महादेव जावळे, तज्ञ संचालक उमेश देशमुख, सचिव दिलीप पुणेकर हे उपस्थित होते.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नानासाहेब पवार, दत्तात्रय ढमढेरे, सुनील वीर, दिपक वीर, आबासाहेब म्हस्के, पोपट तिरखुंडे आदींनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Discussion about this post