जिल्हा नियोजन समितीची बैठक
जिल्ह्याचे नियोजन करतांना प्रत्येक घटकाला
न्याय देण्याचा प्रयत्न- पालकमंत्री अब्दुल सत्तार(प्रति . भानुदास कापडे दै महाराष्ट्र सारथी
छत्रपती संभाजीनगर दि.०३जिल्ह्याचे नियोजन करतांना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच शिक्षण व आरोग्य या सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे पणन वअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी दिलेल्या निधीचा विनियोग काटेकोरपणे करुन शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवावा,असे निर्देशही पालकमंत्री सत्तार यांनी दिले. यावेळी सन २०२४-२५ साठी ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांच्या नियतव्ययास मंजूरीही देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, आ. प्रशांत बंब तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य
Discussion about this post