खा.अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेची विटंबना भाजप सहन करणार नाही= अविनाश मोहिते.
काल सांगलीमध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार अनुरागजी ठाकूर यांच्या प्रतिमेची केलेल्या विटंबनेच्या
काँग्रेसच्या कालच्या या कृत्याला जशास तसे उत्तर म्हणून दिनांक 3- 8 -2024 रोजी स्टेशन चौकातील हिंदुरुदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारका समोर खा.अनुरागजी ठाकुर यांच्या प्रतिमेला दुधाभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शविण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री अविनाश मोहिते म्हणाले,खा. अनुरागजी ठाकूर यांचा वाक्याचा चुकीचा अर्थ लावून काल काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी खा.ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.हे आंदोलन अतिशय दुर्दैवी आहे,सूडबुद्धीचे असून ज्या राहुल गांधींनी संसदेमध्ये हिंदू धर्माला हिंसक, दहशतखोर म्हणून संबोधलं ही गोष्ट या देशातला हिंदू कधीच विसरणार नाहीत.
राहुलजी काँग्रेसने धर्माच्या नावावर यापूर्वीच या देशाची तीन तुकडे केले आहेत.आता जातीच्या आधारे किती तुकडे करणार आता कुठेतरी थांबा नाहीतर देश तुम्हाला माफ करणार नाही.
महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे म्हणाल्या,राहुल गांधीसह काँग्रेस नेते अनेकदा मोदीजींच्या जाती विषयी,चहा व्यवसाय विषयी अपमान जनक टिपणी करत असतात.भाजपला जातीवादी, मनुवादी विचाराचा पक्ष ठरवून राजकीय बदनामी करत आहेत.संसदेच्या अधिवेशनात हातात शंकराची तस्वीर घेऊन सर्व हिंदूना हिंसाचारी, दहशतवादी ठरवणाऱ्या राहुल गांधी यांना जात विचारली म्हणून इतका प्रपोगंड करण्याची काही गरज नव्हती. आम्ही खा.ठाकूर यांच्या प्रतिमेला आज दुध अभिषेक घालून काँग्रेसच्या कृत्याला अचूक उत्तर देत आहोत.यापुढे भाजपच्या कोणत्या नेत्याची अशा पद्धतीची विटंबना, अवहेलना आम्ही सहन करणार नाही. वेळ आल्यास जशास तसे उत्तर देऊ.
या वेळी बोलताना अनुसूचित मोर्च्याची जिल्हाध्यक्ष श्री दादासाहेब कांबळे म्हणाले, आरक्षण, संविधानाबाबत गैरसमज निर्माण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळेच काँग्रेस नेते अशाप्रकारे अफवा पसरून मोदीजींचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.सर्व भाजप ठाकूर यांचे पाठीशी ठाम उभे आहोत.
या आंदोलनामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ गीतांजली ढोपे पाटील, अनुसूचित मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्ष, स्नेहजा जगताप, भाजपा अनुसूचित मोर्चाचे उपाध्यक्ष, श्री राजू मद्रासी, अनुसूचित मोर्चाचे चिटणीस, विकास आवळे,भाजपा कामगार मोर्चाचे सचिव, उदय मुळे, अनुसूचित मोर्चाचे सरचिटणीस श्री संदिपान थोरात,भाजपा कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष प्रकाश आवटी, अनुसूचित मोर्चेचे शहराध्यक्ष प्रशांत चिपळूणकर, कामगार मोर्चाचे किरण चव्हाण, अनुसूचित मोर्चे चे सदस्य अरविंद करडे, पंकज आवळे,अक्षय कांबळे, पती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post