मराठा योद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार ला धारेवर धरत पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. व आपल्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार वर निशाणा साधत आहेत.
तसेच बार्शी तालुक्याचे भाग्य विधाते मराठा भूषण आमदार श्री.राजेंद्र राऊत हे सध्या मराठा समाजाला ओ.बी.सी मधून आरक्षण मिळावे म्हणून विशेष अधिवेशन बोलविण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत.
आज त्यांचा 7 वां दिवस असून त्यांच्या आंदोलनाला बार्शी तालुक्यातून भरघोस प्रतिसाद मिळत असून सर्वच स्तरावरून पाठिंबा सुद्धा मिळत आहे.
परंतू मराठा आरक्षणावर भूमिका मांडणारे व मराठा समाजासाठी आवाज उठवणारे महाराष्टातील पहिले व एकमेव आमदार आहेत.
लवकरच त्यांच्या मागणीला यश मिळेल अशी अपेक्षा बार्शी तालुक्यात व संपूर्ण महाराष्ट्रातील जनता करत आहे.
Discussion about this post