मलकापुर तालुक्यातील धुपेश्वर संस्थान येथे दि.१८सप्टेंबर २४रोजी ह.भ.प.श्री संजयजी महाराज पाचपोर यांचे हस्ते शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.नुकताच श्री संजयजी महाराज पाचपोर यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतीक विभागातर्फे दिला जाणारा आध्यात्मिक क्षेत्रातील संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.त्याअनुषंगाने मलकापूर व नांदुरा वारकरी सांप्रदायिक मंडळींच्या वतीने धुपेश्वर संस्थान येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच निंबोळा येथील निंबादेवी संस्थान व पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराज संस्थान यांनी श्री संजयजी महाराज यांचा सत्कार केल्यानंतर शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.
गोरगरीब शेतकऱ्यांची मुले पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परिक्षेची तयारी करू शकत नाहीत.त्यामुळे त्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या माध्यमातून तयारी करण्रायाची संधी मिळवून देण्यासाठी अभ्यासिका निर्मितीसाठी राजेश गावंडे सतत् प्रयत्नशील असतात.गावंडे हे गावा गावात जाऊन, धार्मिक स्थळी जाऊन उपलब्ध जागेचा शोध घेऊन अभ्यासिका निर्मितीसाठी तत्परतेने कार्यरत आहेत.तसेच अभ्यासिका मध्ये स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः योगदान करतात व इतरांनाही पुस्तके देण्यासाठी आवाहन करुन प्रोत्साहित करतात.नांदुरा येथील शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेतुन दोनशेच्या वर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून शासकीय सेवेत रुजू झाले आहे.तर निंबोळा येथील अभ्यासिकेतुनसुद्धा बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
अभ्यासिकेच्या उदघाटनानंतर राजेश गावंडे यांच्या कार्यात सदैव तत्पर राहु अशी ग्वाही महाराजांनी दिली.व इतर संस्थांनीसुद्धा आदर्श घेऊन कार्य करावे असे आवाहन केले.यावेळी अनेक साधु,महंत, मुक्ताई संस्थानचे हभप हरणे महाराज, शास्त्री महाराज,धुपेश्वर संस्थानचे महेंद्रसिगं रावळ, व्यवस्थापक तेजराव रायपुरे, शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे राजेश गावंडे,कोमलताई सचिन तायडे,प्रज्ञाताई तांदळे, पद्माकर ढोले,अक्षय बोचरे, गोपाल राय पुरे, योगेश पाटील, गायत्री साळुंखे,हभप रामभाऊ झांबरेसह अनेक वारकरी, विद्यार्थी व भक्तगण उपस्थित होते.

Discussion about this post